जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । डॉ.उल्हास पाटील विधी महाविद्यालय जळगाव येथे एलएल. बी. प्रथम वर्ष बी. ए. एलएल. बी. प्रथम वर्ष व एलएल. एम. प्रथम वर्ष विद्यार्थ्यांसाठी सर्व सिनिअर विद्यार्थ्यांनी फ्रेशर्स पार्टीचे आयोजन केले होते.
याप्रसंगी प्रमुख अतिथी गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी त्यांनी प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत व शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात प्रथम वर्ष विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहात व जल्लोषात करण्यात आले. फ्रेशर्स पार्टीत प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांमधून मिस्टर फ्रेशर म्हणून हुसेन खाटीक तर मिस फ्रेशरचा किताब हा प्रियंका बानाईतकर यांनी पटकावला. तत्पूर्वी त्यांना वेगवेगळ्या राऊंड मधून वेगवेगळे टास्क पूर्ण करावे लागले. फ्रेशर्स पार्टी सोबतच सर्व विद्यार्थ्यांसाठी गॅदरिंग २०२२ चे आयोजन करण्यात आले होते. ज्यात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन सोलो डान्स, ग्रुप डान्स, ड्रामा, ग्रुप ड्रामा गायन व इतर स्पर्धांमध्ये भाग घेतला.