फैजपूर, प्रतिनिधी | येथील होले वाड्यातील रहिवासी स्वातंत्र सैनिक चिमण आसाराम होले (वय ९३) यांचे आज (दि. २) वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांचा पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
नारायण, लिलाधर व विनोद होले यांचे ते वडील होते तर भाजपा कार्यकर्ते रामा होले यांचे ते आजोबा होते. १९३६ साली फैजपूर येथे झालेल्या कॉंग्रेसच्या ग्रामीण अधिवेशनात त्यांचा मोठा सहभाग होता. त्याचप्रमाणे १९४२ मध्ये ‘चले जाव’ च्या स्वतंत्र लढ्यात त्यांना धुळे येथे तुरंगवास भोगावा लागला होता. त्यांच्या पार्थीव देहावर महसूल विभागातर्फे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले, यावल तहसीलदार जितेंद्र कुवर, फैजपूर मंडळ अधिकारी जे.डी. बंगाले, तलाठी प्रशांत जावळे, फैजपूर पोलीस स्टेशनतर्फे सहायक फौजदार विजय पाचपोळ, हेड कॉन्स्टेबल हेमंत सांगळे, चेतन महाजन, यशवंत टहाकळे, निलेश काकडे यांनी पुष्पचक्र वाहून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.