कन्हाळे येथे समता फाउंडेशनतर्फे निशुल्क लसीकरण

भुसावळ प्रतिनिधी । तालुक्यातील कन्हाळे येथे समता फाउंडेशन औरंगाबादतर्फे निशुल्क कोरोना लसीकरण करण्यात आले आहे. 

कोरोना लढाईतील महत्त्वाचा टप्पा म्हणजे लसीकरण आज आपल्या देशात देशव्यापी मोहिमेला सुरुवात झालेली आहे. सोमवार दि. ५ जुलै रोजी कन्हाळे या गावांमध्ये समता फाउंडेशन औरंगाबाद यांच्या वतीने निशुल्क कोविशील्ड पहिला डोस देण्यात आला. कन्हाळे बुद्रुकचे माजी सरपंच मोहम्मद गवळी यांच्या सहकार्याने व रवी सपकाळे नगरसेवक भुसावळ यांच्या मार्गदर्शनाखाली मोहिमेला सुरुवात करण्यात आली.

प्रसंगी कन्हाळे खुर्द ची सरपंच मोहन पाटील उपस्थित होत. गावातील साठ टक्के लोकांनी या मोहिमेचा फायदा घेतला कन्हाळे बुद्रुक पोलीस पाटील, रेवसिंग पाटील, चांद गवळी, जगदीश इंगळे, गणेश पाटील आदी उपस्थित होते. सकाळी नऊ वाजेपासून लसीकरणाला सुरुवात झाली व संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसीकरण करण्यात आले. शेवटी समारोप या कार्यक्रमामध्ये मोहम्मद यांनी समता फाउंडेशन च्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार मानले व कार्यक्रम संपन्न झाला.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!