यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष यावल तालुक्याच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिरास सुरुवात झाली.
आज दिनांक १७ सप्टेंबर २०२२ वार शनिवार रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७२ व्या वाढदिवसा निमित्त यावल येथे भारतीय जनता पार्टीच्या तालुका शाखेच्या वतीने नागरिकांच्याच्याआरोग्य हिताच्या दृष्टीकोणातुन मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या शिबीरास परिसरातील रुग्णांकडुन उत्तम प्रतिसाद मिळाला.
या शिबिराचे आयोजन येथील युवा समाजसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल भुसावळ रोड यावल येथे केले होते. या शिबिराचे उदघाटन भाजपा जेष्ठ जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.जनसेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यावल येथे संपन्न झालेल्या या शिबीरास डॉ. पवन सुशील व डॉ. प्रवीण पाटील यांनी मोफत रुग्णांची तपासणी करून ओषधपोचारा बाबत योग्य मार्गदर्शन केले.
या मोफत आरोग्य शिबिरामध्ये एकूण १५० गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. या प्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी भाजपा किसान मोर्चा जळगाव जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य सौ. सविता अतुल भालेराव, भाजपा तालुका सरचिटणीस विलास चौधरी, आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे, ओ.बी.सी. सेल जळगाव जिल्हा उपाध्यक्ष हेमराज फेगडे, कामगार आघाडी जिल्हा अध्यक्ष विजय मोरे यावल शहर उपाध्यक्ष योगेश चौधरी, सरला कवडीवाले, सरचिटणीस परिष नाईक, मनोज बारी आदींची उपस्थिती होती.