चोपडा प्रतिनिधी । तालुक्यात रोटरी क्लब ऑफ चोपडा यांच्या वतीने गरजू रुग्णांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर आज दुपारी 2 वाजता उपकेंद्र, विरवाडा येथे घेण्यात आले. या शिबिराचा 110 रुग्णांनी लाभ घेतला आहे.
शिबिराच्या सुरुवातीला प्राथमिक आरोग्य केंद्रतर्फे रोटरी क्लब अध्यक्ष नितिन जैन व मानद सचिव धीरज अग्रवाल यांचे सत्कार करण्यात आले. डॉ.प्रकाश लोमटे, वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र, गोरगावले व आशा वर्क्स भगिनींनी आजुबाजुच्या खेड़यावर जावून कैम्प घेऊन त्याबद्दल प्रचार करुन त्यांना शिबीराचा लाभ घेण्यास सांगितले. शिबिरावेळी मोफत वैद्यकीय सेवा रोटेरियन डॉ. पवन पाटील, रोटेरियन डॉ.नीता जैस्वाल यांनी दिली. तसेच मोफत औषधी रोटेरियन प्रवीण मिस्त्री यांनी पुरवली तर औषधी वाटपाचे सहकार्य सुनील महाजन आणि प्रदीप पाटील यांनी केले आहे. रुग्ण तपासनीसाठी डॉ.विनायक पाटील, डॉ.राहुल बी.पाटील, डॉ.राहुल आर.पाटील यांनी मदत केली आहे. यावेळी गरोदर मातांसह लहान बालकांच्याही मोठ्या संख्येने समावेश होता. शिबीर यशस्वीतेसाठी टेरियन एम डब्ल्यू पाटील, डॉ.शेखर वारके, प्रसन्न गुजराथी, नितिन जैन, धीरज अग्रवाल, दिलीप जैन, पृथ्वीराज राजपूत, विपुल छाजेड़, चेतन टाटीया, यांनी अथक परिश्रम केले.