जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । माजी जलसंपदा मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांचा वाढदिवस मंगळवार, दि.१७ मे रोजी संपन्न झाला. त्या निमित्ताने भाजपा युवा मोर्चा शाखेतर्फे शहरातील जी.एम. हॉस्पिटलमध्ये मोफत आरोग्य शिबीर घेण्यात आले.
यावेळी माजी जि.प.अध्यक्ष दिलीप खोडपे, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, नगरपालिका उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील, गटनेते डॉ.प्रशांत भोंडे, जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, आतिश झाल्टे, बाबुराव हिवराळे, दीपक तायडे, पंचायत समिती सभापती जलाल तडवी, उपसभापती पंचायत समिती सदस्य सुरेश बोरसे, भाजपा तालुका अध्यक्ष निलेश चव्हाण, रवींद्र झाल्टे, नवल पाटील, डॉ.संजीव पाटील, डॉ.विश्वनाथ चव्हाण, डॉ.राजेश नाईक, कैलास पालवे, वैभव पाटील, मनोज जंजाळ, अक्षय जाधव यांच्यासह भारतीय जनता पार्टी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नगरसेवक यांचे उपस्थिती होती.