Home आरोग्य जळगावात उज़्मा बहुउद्देशीय संस्थेतर्फे मोफत मधुमेह तपासणी शिबीर

जळगावात उज़्मा बहुउद्देशीय संस्थेतर्फे मोफत मधुमेह तपासणी शिबीर

0
32

jalgaon


‌जळगाव प्रतिनिधी । येथील उज़्मा बहुउद्देशीय संस्थेतर्फे आज दि.१४ नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिनानिमित्ताने मेहरुण, अक्सा नगर मधील शम्मास मेडिकल शेजारी, उज़्मा क्लिनिक मध्ये सकाळी १० ते दुपारी ३ वाजेदरम्यान मोफत मधुमेह तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.

जागतिक मधुमेह नियंत्रण दिनाचे औचित्य साधून संस्थेचे सचिव डॉ.अल्तमश हसन यांनी उपस्थित शिबिरार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्याची बदलती जीवनशैली व फास्ट फूड सेवनामुळे मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढ होत आहे. नियमित व्यायाम करीत राहिल्यास आणि पौष्टिक आहार घेतल्यास मधुमेह टाळता येऊ शकतो. या शिबिराचा लाभ परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घेतला. शिबीर यशस्वीतेसाठी हसन शेख, शुमीत अल्तमश व जरीब मन्यार यांनी परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound