एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील कासोदा येथील ३१ वर्षीय तरूणाला अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देवून १७ हजाराची ऑनलाईन फसवणूक करून पुन्हा पैश्यांची मागणी केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जळगाव सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील ३१ वर्षीय तरूण हा आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. फेब्रुवारी २०२१ ते ८ जून २०२२ दरम्यान त्यांना अनोळखी नंबरवरून अश्लिल मॅसेज व अर्धनग्न पाठवून चॅटींग करण्यात आले. तरूणाच्या मोबाईलवर खून केलेले, रक्तबांबाळ असलेले व्हिडीओ पाठवून तुझा देखील खून करून मृत्यू घडवेल अशी धमकी दिली. या धमकीला घाबरून तरूणाने दिलेल्या फोन पे नंबरवरून २ हजार आणि १५ हजार असे एकुणन १७ हजार रूपये पाठविले. पैसे दिल्यानंतर समोरील अज्ञात व्यक्तीने पुन्हा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्या धमकीला कंटाळून तरूणाने थेट गुरूवारी ९ जून रोजी दुपारी अडीच वाजता जळगाव सायबर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे करीत आहे.