पॅरीस-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी गुरुवारी मिशेल बार्नियर यांची फ्रांसचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली. सरकारी निवेदनात म्हटले आहे की, बार्नियर यांना देश आणि फ्रान्सची सेवा करण्यासाठी एकत्रित सरकार स्थापन करण्याचे काम देण्यात आले आहे. 70 वर्षीय बार्नियर हे माजी ब्रेक्झिट निगोशिएटर आहेत. त्यांनी 2016 ते 2021 पर्यंत यूरोपीय संघ आणि ब्रिटन यांच्यात ब्रेक्झिटची वाटाघाटी केली होती.
दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर ही नियुक्ती करण्यात आली आहे. बार्नियर यांनी यापूर्वी देशाच्या सरकारमध्ये विविध पदांवर काम केले आहे. ते यापूर्वी युरोपियन युनियनचे आयुक्तही राहिले आहेत. बार्नियर यांचा जन्म 9 जून 1951 रोजी झाला. ते फ्रान्सचा पुराणमतवादी पक्ष लेस रिपब्लिकन (LR)चे नेते आहेत. वयाच्या 27 व्या वर्षी सोवई जिल्ह्यातून विजयी होऊन ते पहिल्यांदाच संसदेत निवडून आले.