जळगाव प्रतिनिधी । पुण्यातील डॉ. डी.वाय.पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या बीई मेकॅनिकल विभागाचा विद्यार्थी तथा जळगाव येथील रहिवासी आयुष सतीश अग्रवाल यांना फ्रान्सच्या डॅसॉल्ट सिस्टम कंपनीतर्फे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील – डिझाईन स्पर्धेत आकृती – २०१९ मध्ये द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले.
आयुष अग्रवाल यांना ट्रॉफी, डसॉल्ट मधील नोकरीची संधी, 60 हजारांची रक्कम, यूएसए येथे शैक्षणिक भेटीची संधी देऊन सम्मानित करण्यात आला.या स्पर्धेत देशातील एकूण ३३२ महाविद्यालयांमधील ४९३२ विद्यार्थ्यांच्या २४६६ संघांनी भाग घेतला होता.