नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | गेल्या महिन्यात राज्यसभेची निवडणूक बिनविरोध झाली. आता या राज्यसभेच्या सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे.
यात सोनिया गांधी, अजय माकन, सय्यद नासिर हुसेन (काँग्रेस), रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, आर. पी. एन. सिंह, मदन राठोड, सामिक भट्टाचार्य (भाजप), संजयकुमार झा (संयुक्त जनता दल), शुभाशिष खुंटीया, देबाशिष सामंतराय (बिजू जनता दल), गोल्ला बाबूराव, एम. आर. रेड्डी, वाय. व्ही. सुब्बा रेड्डी (वायएसआर काँग्रेस) आणि रवीचंद्र वाडीराजू (बीआरएस) या चौदा नेत्यांनी ४ एप्रिल रोजी गुरुवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यसभा सभापती जगदीप धनकड यांनी नवनिर्वाचित सदस्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सोनिया गांधी प्रथमच राज्यसभेच्या खासदार झाल्या आहे. त्या राजस्थानमधून खासदार झाल्या आहेत.