भीषण अपघातात चार युट्यूबर्सचा मृत्यू

अमरोहा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात दोन कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार युट्यूबर्सचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण जखमी झाले आहेत. लकी, सलमान, शाहरुख आणि शाहनवाज अशी मृतांची नावे आहेत. रिपोर्ट्सनुसार, मृत युट्यूबर्स राउंड २ वर्ल्ड यूट्यूब चॅनेलवर विनोदी कंटेंट तयार करत होते. मिळालेल्या माहितीनुसार,युट्यूबर्सचा हा ग्रुप गजरौला येथून बुलंदशहरला जात होता. वाढदिवसाची पार्टी करून घरी परतत असताना युट्यूबर्सच्या कारला समोरून येणाऱ्या बोलेरोने धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमली. लोकांनी चौघांना रुग्णवाहिकेतून गजरौला सरकारी रुग्णालयात दाखल केली. मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

जखमींना अमरोहा जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अपघातस्थळाची पाहणी केली आहे. पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर उत्तर प्रदेशातील मुसेपूर गावात सोमवारी झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून ६ जण जखमी झाले आहेत.घटनेनंतर याची माहिती कुटूंबीयांना देण्यात आली. तरुण मुलांच्या मृत्यूने कुटूंबीयांना धक्का बसला आहे. हे चार तरुण गजरौला येथून बुलंदशहरकडे जात असताना हसनपुर कोतवाली परिसरात हा अपघात झाला. ही घटना अमरोहा जनपद येथील हसनपूर कोतवाली क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या मनौटा पुलाजवळ झाली. रविवारी रात्री भरधाव वेगाने जाणाऱ्या दोन कार एकमेकांवर आदळल्या. यामध्ये चार तरुणांचा मृत्यू झाला तर दुसऱ्या गाडीतील सहा जण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी सांगितले की, मृतांची नावे लक्की, सलमान, शाहरुख आणि शाहनवाज अशी आहेत. ते सर्वजण अमरोहा जनपद येथील गजरौला येथील रहिवासी होती. हे तरुण एकमेकांचे मित्र होते व यूट्यूब वर व्हिडिओ बनवण्याचे काम करत होते. हे चार मित्र कामानिमित्त बुलंदशहरला जात होते. तेव्हा रस्त्यातच हा अपघात झाला. अपघाताची सूचना मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी चारही तरुणाचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी अमरोहाला पाठवले आहेत. या अपघातात आर्टिका कार आणि बोलेरोची समोरासमोर धडक झाली.

Protected Content