मेहुणबारे येथे प्रॉपर्टीसाठी विवाहितेचा छळ; पतीवर गुन्हा दाखल

चाळीसगाव प्रतिनिधी । आई वडीलांची प्रॉपर्टी नावावर होण्यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पती विरूध्द चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनिषा प्रकाश महाजन (वय-३४) रा. मेहुणबारे ह.मु. चाळीसगाव यांचा विवाह समाजाच्या रितीरिवाजाप्रमाणे २००२ मध्ये मेहुणबारे येथील प्रकाश जगन्नाथ महाजन यांच्याशी झाला. सुरूवातीला ए‍क वर्षापर्यंत चांगली वागणूक दिली. त्यानंतर घरातील किरकोळ कारणावरून भांडण करणे व मारहाण करणे हे सुरू झाले. दोघांच्या संसारवेलीवर जगृती नावाची मुलगी झाली. त्यावेळी मात्र पती प्रकाश याने विवाहितेच्या आईवडीलांची प्रॉपर्टी माझ्या नावावर करून द्यावी असा तगादा लावला. त्यावर मला दोन भाऊ आहे ते मला प्रॉपर्टी कशी देतील असे सांगितल्यावर विवाहितेला मारहाण करण्यास सुरूवात केली. हा प्रकार सहन करत असतांना विवाहितेला दुसरे अपत्य पियुष आला. परंतू तरी देखील विवाहितेचा छळ सुरूच होता. १२ जून २०२१ रोजी विवाहितेला पती प्रकाशने घराबाहेर काढून हाकलून दिले. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून गेल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content