सावदा ता. रावेर प्रतिनिधी । सावदा कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या स्वॅबच्या अहवालात आज चार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील तीन रूग्ण हे पाणीपुरवठा विभागातील तीन कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या वृत्ताला मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.
शहरातील कोवीड केअर सेंटरने संशयित रूग्णांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. आढळून आलेल्या रूग्णांपैकी तीन रूग्ण सावदा नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे तीन कंत्राटी कर्मचारी असून एक रूग्ण ओम कॉलनीतील महिला आहे. सावद्यात एकुण ७८ रूग्ण बाधित झाले असून त्यापैकी १० जणांचा मृत्यू तर १८ जण उपचार घेत आहे. तसेच ५० रूग्ण बरे होवून घरी सोडण्यात आले आहे. या वृत्ताला मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे. नागरीकांनी शहरात विनाकारण फिरू नये व शासनाच्या नियमांचे उल्लंघन करू नये असे आवाहन सावदा नगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.