पुरामध्ये वाहून गेलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना चार लाखांची मदत

पारोळा प्रतिनिधी । गिरणा नदीला पुर आल्यामुळे पिंपळगाव येथील तरूण भुषण पाटील पुरात वाहुन गेल्याने त्यांचे दुर्दैवी निधन झाले. अशा वेळी आ.चिमणराव पाटील यांनी कुटुंबियांना धीर देण्यासाठी तात्काळ शासनाकडे पाठपुरावा करून अर्थसहाय्य म्हणुन ४ लाख रूपये मंजुर करून दिले. 

याबाबत अधिक माहिती अशी की, मौजे पिंपळगाव ता. भडगांव येथे दि.२३ सप्टेंबर रोजी गिरणा नदीला पुर आल्यामुळे पिंपळगांव येथील तरूण भुषण अशोक पाटील हे त्या पुरात वाहुन गेल्याने त्यांचे दुर्दैवी निधन झाले. भुषण हे कुटुंबातील कर्ता असल्याने त्यांचा निधनानंतर कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती. अशा वेळी आमदार चिमणराव पाटील यांनी कुटुंबियांना धिर देण्यासाठी तात्काळ शासनाकडे पाठपुरावा करून अर्थसहाय्य म्हणुन ४ लाख रूपये मंजुर करून आणले. त्यानिमित्त भुषण याचे वडील अशोक पाटील यांना ४ लाख रूपयाचा धनादेश देतांना आमदार चिमणराव पाटील, मुकेष हिवाळे तहसिलदार भडगाव, मा.जि.प.सदस्य दिनकर आबा, शेतकी संघ संचालक, भडगांव जयवंत पाटील, वसंतराव पाटील, सरपंच, अंजनविहीरे बापुराव पाटील, सोपान पाटील, संदिप पाटील, प्रदिप पाटील, सरपंच पिंपळगांव भाऊसाहेब पाटील, शंकर पाटील, नितीन दादा, राजेद्र पाटील, विरभान बापु, डिगंबर शंकर पाटील आदी उपस्थित होते.

 

Protected Content