अवैध दारुची वाहतूक करणाऱ्या रिक्षासह चौघांना अटक

jalgaon 7

 

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहर वाहतूक शाखेच्या पथकाने जळगाव ते एरंडोल दरम्यान वाहनांची चौकशी सुरु असताना शहरातील दादावाडी जवळ अवैधरित्या दारूची वाहतूक करणाऱ्या रिक्षासह चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. यावेळी 60 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जळगाव शहर वाहतूक शाखाच्या पथकाने पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दुपारी 3:30 वाजेच्या सुमारास शहरातील दादावाडी परिसरात अवैधरीत्या दारूची वाहतूक करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करत असलेला 60 हजार रुपये किंमतीचा दोन हजार बाटल्या जप्त करण्यात आला आहे.

यांना घेतले ताब्यात
रिक्षा क्रमांक (एमएच 19 सी डब्ल्यू 2854) या रिक्षामध्ये जळगाव होऊन अकोल्याला धरणगाव रेल्वेस्टेशनहुन घेऊन जाणाऱ्या 60 हजार रुपये किमतचे 2 हजार टॅंगो पंचच्या दारूच्या बाटल्या दहा गोण्यांमध्ये घेऊन जात असल्याची संशय वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने रिक्षाचा पाठलाग करून दादावाडी येथे पकडले. यात त्यांनी रिक्षाचालक विनोद श्रावण शेजवळ रा. जळगाव, अलका राहुल भाट (वय 35), प्रितेश श्रावण बागडे (वय 20) आणि रितेल राम मालतेक (वय18) सर्व रा. कंजरवाडा, सिंधी कॉलनी परिसर यांना ताब्यात घेतले आहे.

यांनी केली कारवाई
वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, जीतू पाटील, योगेश पाटील, दीपक महाजन, संजय नाईक यांच्यासह इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली असून 60 हजार रुपये किमतीचा दारूचा मुद्देमाल आणि चौघा संशयित आरोपींना तालुका पोलीस यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Protected Content