यावल, प्रतिनिधी | तालुक्यातील अट्रावल येथे थोर पुरूषांच्या प्रतिमेची विटंबना केल्यावरुन पाच संशयितांविरूध्द शनिवारी रात्री अॅक्ट्रासीटीसह अन्य कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. त्यापैकी चार संशयीत आरोपींना पोलिसांनी शनिवारी सायंकाळी ताब्यात घेतले होते, त्यांना आज (दि.११) दुपारी चौकशीअंती अटक करण्यात आली आहे. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून बंदोबस्तासाठी दंगा नियंत्रण पथकाच्या दोन तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
अधिक माहिती अशी की, शनिवारी (दि.१० ऑगस्ट) सायंकाळी ६.३० च्या सुमारास झालेल्या या घटनेमुळे अट्रावल गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. घटनेचे वृत्त कळताच यावलयेथील पोलीस निरिक्षक रविकांत सोनवणे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेन्द्र खैरनार यांच्या सहाय्यक फौजदार सुनिता कोळपकर, हे.कॉ. संजय तायडे या सहका-यांसह तात्काळ गावात धाव घेतली व शांतता प्रस्थापित केली होती. या वेळेस परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवुन अप्पर पोलीस अधिक्षक भारती नवटके, विभागीय पोलीस अधिक्षक नरेंद्र पिंगळे यांनीही घटनास्थळी भेट दिली दिली. सध्या गावात तणावपुर्ण शांतता आहे.
तालुक्यातील अट्रावल येथील घटनेतील संशयीत आरोपी मिलींद उर्फ धोंडु जगन कोळी, कुंदन उर्फ गोलु कोळी, हेमंत उर्फ हितेश विक्रम कोळी, आकाश उर्फ रावण भागवत कोळी व लखन दिनु कोळी यांच्याविरूध्द भादवी कलम २९५, ४४७, ४२७ सह अनु. जाती/जमाती सुधारणा कायदा २०१५ च (३) (आय) प्रमाणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यापैकी चौघांना पोलीसांनी अटक केली आहे. विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.