रोजगार हमी योजनेचे कामे यंत्राद्वारे होत असल्याची माजी सरपंचाची तक्रार

पारोळा प्रतिनिधी । लोकडाऊनच्या काळात मजुरांनाची रोजगार आभावी उपासमार होऊ नये म्हणून राज्य व केंद्र शाखा वतीने रोजगार हमी योजनेचे कामांना सुरुवात करण्याचे निर्देश देण्यात आले होते. अनेक कामे हे जिल्हा तालुक्यात सुरू देखील आहेत. परंतु या कामांवर प्रत्यक्ष पूर्ण मजुर काम न करता विविध यंत्रणेद्वारे ती कामे केली जात असल्याची तक्रार भिलाली येथील माजी सरपंच यांनी पांचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे केली आहे.

लॉक डाऊन काळात असंख्य कंपन्या व उद्योगधंदे ही बंद पडली होती. त्यामुळे गोरगरीब जनतेची व मजुरांची उपासमार ही होत होती. ती उपासमार टाळण्यासाठी राज्य व केंद्रांनी गावागावात रोजगार हमी योजनेची कामे मंजूर करून ते तात्काळ सुरू करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने हीवरखेडे व भिलाली या दोन गावातील जिल्हा परिषद शाळचे वॉल कंपाऊंड काम हे मंजूर होऊन ती सुरू आहेत. ही सर्व काम यंत्रणा ऐवजी मजुरा कडूनच करून घेणे हे बंधनकारक व गरजेचे असतांना त्यातील काही कामे जेसीबी द्वारे करण्यात आले असल्याची तक्रार भिलाली येथील माजी सरपंच दत्तू पाटील यांनी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्याकडे लेखी स्वरुपात केली आहे.

संबंधित कामांवर जेसीबी सुरू असल्याचे व्हिडीओ चित्रीकरण देखील त्यांनी केले असून या कामांचे बिले अदा करण्यात येऊ नये असे देखील त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तालुक्यात जिल्हा परिषद शाळेचे वॉल कंपाऊंड कामे ही सुरू आहेत. अशा अनेक कामांवर जेसीबी यंत्र द्वारे खड्डे खोदण्यात आले आहेत. विशेष म्हणजे काही ठिकाणी कागदोपत्री मजूर दाखविले जात आहे.प्रत्यक्षात ठेकेदार, काही ज्युनियर इंजिनारच ही कामे करीत असल्याचा धक्कादायक प्रकार देखील सुरू असल्याची ओरड येत आहे. या प्रकाराची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Protected Content