Home क्रीडा पाकिस्तानचे माजी कर्णधार आफ्रिदीने केले विराटचे कौतुक

पाकिस्तानचे माजी कर्णधार आफ्रिदीने केले विराटचे कौतुक

0
22

virat

नवी दिल्ली वृत्तसंस्था । पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी याने भारतीय कर्णधार विराट कोहलीचे तोंड भरून कौतुक केले आहे. त्याने कोहलीचे अभिनंदन करत म्हणाला ‘विराट एक शानदार खेळाडू आहेस आणि तुला सतत यश मिळत राहो या माझ्याकडू शुभेच्छा’.

कोहलीने बुधवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात ७२ धावांची दमदार खेळी केली होती. यात ७२ धावा करताना त्याने ४ चौकार आणि ३ षटकार लगावले. भारतापुढे विजयासाठी १५० धावांचे लक्ष्य होते. कोहलीने केलेल्या धावांच्या बळावर भारताने १९ षटकांमध्ये तीन गडी गमावत १५१ धावा करत सामना जिंकला. या दमदार कामगिरीमुळे विराट सामनावीर ठरला. कोहलीने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये ५०+ सरासरीने धावा केल्याने आफ्रिदी प्रभावित झाला आहे. शाहिद आफ्रिदीने आयसीसीचे ट्विटवर ट्विट केले की, ‘विराट कोहलीचे अभिनंदन. जगभरातील क्रिकेटप्रेमींचे अशाच प्रकारे मनोरंजन करत राहा.’ यापूर्वी आफ्रिदीने विराटची अनेकदा प्रशंसा केली आहे.


Protected Content

Play sound