धरणगाव, प्रतिनिधी | तालुक्यात आज माजी खासदार ए. टी. नाना पाटील यांनी परत एकदा आपल्या कार्यकर्त्यांच्या प्रत्येक तालुक्यात घेऊन भेटीगाठी सुरू केलेली आहे.
माजी खासदार एटी नाना प्रत्येक तालुक्यात जाऊन कार्यकर्त्यांना भेटत अहे. आज त्यांनी धरणगाव तालुक्यातील कार्यकर्त्यांची भेट घेतली. या उलट विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी निवडून आल्यापासून तालुक्यांमध्ये भेट दिलेले नाही. खासदार उन्मेष पाटील यांनी देखील निवडून आल्यानंतर भेट देणे गरजेचे होते मात्र त्यांनी तालुक्याला भेट दिली नसल्याची खंत कार्यकर्त्यांकडून व्यक्त केली जात आहे. यामुळे विद्यमान व माजी खासदार यांच्या भेटीबद्दल एकच चर्चा तालुक्यात सुरु झाली आहे.