माजी मंत्री विजय शिवतारे शिंदे गटात दाखल

पुणे – लाईव्ह ट्रेंडस न्युज वृत्तसंस्था । एकीकडे राज्यातील वातावरण तापत असतानाच माजी मंत्री विजय शिवतारे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली आहे. त्यांच्यासोबत पक्षाचे 39 आमदार असून अन्य अकरा अपक्ष आमदारांचाही त्यांना पाठिंबा आहे. यासोबत आता माजी आमदार व मंत्री हे देखील त्यांच्या गटात सामील होत असल्याचे दिसून येत आहे. या अनुषंगाचे शिवसेना पक्षाचे जेष्ठ नेते तथा माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होत असल्याचे जाहीर केले. त्यांनी याप्रसंगी संजय राऊत यांच्यावर कडाडून टीका केली.

विजय शिवतारे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 52 उमेदवार हे दुसऱ्या क्रमांकावर होते. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुतांश आमदार जिंकून आले आहेत. ज्यांच्याशी आम्ही लढा दिला ज्यांच्या सोबत लढले त्यांना सोबत घेण्याचे काम संजय राऊत यांनी केले. संजय राऊत यांनी महाविकास आघाडीची मोट बांधली असून यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सत्ता मिळाली आहे. मात्र असे असूनही राऊत यांनी शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस समोर झुकवले यामुळे महा विकास आघाडी सत्तेत आली पण शिवसेनेच्या आमदारांची कामे झालीच नाहीत यासोबत शिवसेनेच्या अन्य पदाधिकाऱ्यांची सुद्धा कोणतीही कमी झालेले नाहीत. यामुळे आपण यापुढे एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होत असल्याचे त्यांनी जाहीर केले.

 

 

 

Protected Content