जामनेरात माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांच्या कन्येचा उद्या विवाह  

जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । येथे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन यांची कन्या श्रेया यांचा विवाह सोहळा उद्या दिनांक 20 रोजी संपन्न होणार असून या सोहळ्यासाठी केंद्रीय मंत्री विरोधी पक्षनेते यांच्यासह शंभराच्यावर आमदार आणि खासदार हजेरी लावणार आहेत.

साधना महाजन आणि गिरीश महाजन यांची सुकन्या चि.सौ.कां.श्रेया यांचा शुभविवाह रा.चहार्डी हल्ली पुणे येथे वास्तव्यास असलेले राजश्री गुजर आणि अजय गुजर यांचे सुपुत्र चि.अक्षय यांच्याशी रविवार, दिनांक 20 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता जामनेर येथे संपन्न होत आहे, गिरीश महाजन यांचे जावई अक्षय गुजर यांची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसून ते आयटी इंजिनियर आणि  फूड इंडस्ट्रीचे मालक आहेत.

या विवाह सोहळ्यासाठी शाही मंडप सजविला असून हजारोच्या संख्येने नागरिक या विवाह समारंभास उपस्थित राहणार आहेत. हा विवाह सोहळा जामनेर शहरातील हिवरखेडा रोडावरील गोविंद महाराज संस्थानच्या जागेत पार पडणार असून सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Protected Content