जळगाव प्रतिनिधी । बनावट फेसबुक खाते तयार करून त्यावरून आ. गिरीश महाजन यांच्या व्हिडिओवर आक्षेपार्ह व बदनामीकारक कमेंट करणाऱ्या अज्ञात इसमाविरूध्द जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात इसमाने त्याची स्वत ची ओळख लपवून बनावट फेसबुक खाते तयार केले. या फेसबुक खात्यावरुन त्याने ११ नोव्हेंबर रोजी माजी मंत्री आमदार गिरीष महाजन सपोर्टर या नावाचे फेसबुक खात्यावरील आमदार गिरीश महाजन यांच्या व्हिडिओवर आक्षेपार्ह व बदनामीकारक कमेंट केली. अशा आशयाच्या तुषार पुरुषोत्तम चौधरी (वय २८) रा. प्रेमनगर जामनेर यांच्या तक्रारीवरुन अज्ञात इसमाविरोधात जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.