हैदराबाद-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा | तेलंगणातील प्रबळ पक्ष असलेला भारत राष्ट्र समिती या पक्षाचा गेल्या वर्षी विधानसभा निवडणूकीत पराभव झाला आणि तेथे काँग्रेस सत्तेत येऊन रेवंथ रेड्डी मुख्यमंत्री झाले. आता तेलंगणात भारत राष्ट्र समितीला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे उपमुख्यमंत्री राहिलेले कदियम श्रीहरी यांनी मुलगी काव्या हिच्यासह काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत भारत राष्ट्र समितीचे माजी आमदार बी मोहने रेड्डी यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री रेवंत रेड्डी आणि काँग्रेसच्या तेलंगण प्रभारी दीपा दासमुन्शी उपस्थित होते.
काव्या कदियम यांना काँग्रेस आगामी लोकसभेचे तिकीट देणार आहे. त्यांना भारत राष्ट्र समितीने वारंगल लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे तिकिट दिले होते. पण त्यांनी ते तिकिट नाकारले. कादियम श्रीहरी हे अविभाजित आंध्र प्रदेशाचे उपमुख्यमंत्री होते. त्यांनी राजकीय कारकीर्दीची सुरूवात तेलूगू देसम पक्षासोबत केली होते. पण त्यानंतर ते भारत राष्ट्र समितीमध्ये गेले होते. आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.