माजी आ. रमेश चौधरी यांना मातृशोक

यावल लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील किनगाव येथील रहिवाशी तसेच तीन वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व करणारे माजी आमदार रमेश चौधरी यांच्या मातोश्री पार्वताबाई विठ्ठल चौधरीयांचे १०० व्या वर्षी आज वृद्धापकाळाने रात्री निधन झाले.

सोमवारी ६-मे रोजी दुपारी १२ वाजता राहत्या घरातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात मुलं सुना नातवंडे असा परिवार आहे. त्या माजी आमदार रमेश चौधरी आणि प्रगतीशील शेतकरी चंद्रकांत चौधरी यांच्या मातोश्री तर जिल्हा परिषद सदस्य रत्‍नाताई चौधरी यांच्या सासू होत.

Protected Content