Home Cities जळगाव गिरणा नदीवर समांतर पूलासह बंधारा बांधण्यासाठी कृती समितीची स्थापना

गिरणा नदीवर समांतर पूलासह बंधारा बांधण्यासाठी कृती समितीची स्थापना


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहर लगत असलेल्या बांभोरी पुलाचे समांतर रस्ते व बंधारा बांधण्या साठी रविवारी १९ नोव्हेंबर रोजी अजिंठा विश्रामगृह येथे बैठक घेण्यात आली. यावेळी कृती समितीची स्थापना करण्यात आली.

जळगाव शहर लगत असलेल्या बांभोरी पुलाचे समांतर रस्ते सह बंधारा बांधण्याची प्रशासकीय मान्यता असताना सुद्धा फक्त पुलाचे बांधकामाचे टेंडर निघाल्याने त्यावर आवश्यक तो निधी वाढवून बंधारासह पुलाचे बांधकाम व्हावे, या साठी हि कृती समिती आवश्यक तो पाठपुरावा करणार आहे. पूर्वीची समांतर रस्ते कृती समिती हीच बांभोरी पुल – बंधारा कृती समिती म्हणून कार्यरत आहे. सार्वजनीक बांधकाम अधीक्षक अभियंता यांना सोमवारी २० नोव्हेंबर सोमवारी सकाळी ११ वाजता निवेदन देण्यात येणार आहे. अशी माहिती कृती समितीच्या वतीने देण्यात आले आहे. याप्रसंगी सरिता माळी – कोल्हे, डॉ राधेश्याम चौधरी, विष्णू भंगाळे, सुनील महाजन, जमील देशपांडे, विनोद देशमुख, ॲड. झालटे, शिवराम पाटील, बंटी जोशी, आशुतोष पाटील, फारुक शेख यांच्यासह आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound