हृदयविकाराच्या झटक्याने तरूणाचा दुदैवी मृत्यू !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । छातीत त्रास होऊन ह्रदयविकाराचा झटका आला आणि काही क्षणातच २६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. एवढ्या कमी वयात ह्रदयविकाराने तरुणाचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

आसोदा येथील भूषण किसन बोरसे (२६, रा. आसोदा, ता. जळगाव) या तरुणाला शनिवार, १८ नोव्हेंबर रोजी दुपारी छातीत त्रास होऊ लागला. त्याला रुग्णालयात नेण्याची तयारी करीत असतानाच ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मयत घोषित केले. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ रामकृष्ण इंगळे करीत आहेत.

Protected Content