रावेर प्रतिनिधी । जामन्या वनक्षेत्रात अनअधिकृत पणे वनविभागाच्या सुमारे सात हेक्टर जमीनीवर अवैध पध्दतीने केलेल्या अतिक्रमणावर वनपाल अक्षय म्हेत्रे यांच्या टीमने धडक कारवाई करत अतिक्रमण काढले आहे
या बाबत वृत्त असे की, यावल अभरण्यातील जामन्या वनक्षेत्रातील कक्ष क्र २० मध्ये सुमारे ७ हेक्टर जमिनिवर अनअधिकृतपणे अतिक्रमण केले होते. या अनुषंगाने नुकतेच वनपाल म्हेत्रे यांच्या टीममने अतिक्रमण काढून अभयरण्य पूर्ण मोकळे केले आहे. त्यांच्या चमूमध्ये वनपाल ललित सोनार, श्री चौधरी,श्री जाधव,वनपाल अयूब तडवी, वनरक्षक हुकार्या बारेला, सतीश वाघमारे, सेमी बारेला,सोनाली बारेला, के. बी. पवार, राजू तडवी, राजू बोंडाल, राजमल बारेला, सविता बारेला, सफीना तडवी, नवल जाधव यांच्या सह वनकर्मचारी, यावल अभयारण्याचे कर्मचारी व मजुर यांचा समावेश होता. तर या कारवाईसाठी एसआरपी गट क्र ६ बटालियनचे एएसआय के. एस. परदेशी यांनी मदत केली.