पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेवर जबरी अत्याचार केल्याचा धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पारोळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील एका गावात २५ वर्षीय महिला ही ही आपल्या दोन मुलांसह वास्तव्याला आहे. शेती करून आपला उदरनिर्वाह करतात. १० डिसेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घरात सर्वजण झोपलेले असताना गावात राहणारा सुरेश भिकन पवार हा महिलेच्या घरात घुसून तिच्यावर जबरी अत्याचार केला. तसेच तिला मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. हा प्रकार घडल्यानंतर विवाहितेने तिच्या नातेवाईकांना सांगितले. नातेवाईकांनी जाब विचारासाठी सुरेश पवार यांच्या घरी गेले असता त्याच्या वडिलांनी शिवीगाळ करून पारोळा पोलीस ठाण्यात विवाहिते विरोधात तक्रार दिली. दरम्यान महिलेला तिच्या नातेवाईकांनी धीर देत पोलीस ठाणे गाठले व संशयित आरोपी सुरेश भिकन पवार यांच्या विरोधात तक्रार दिली. विवाहितेच्या तक्रारीवरून पारोळा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी सुरेश भिकन पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहे.