जबरी चोरी : कर्मचाऱ्यांना बाधुन फर्निचर दुकानातून ५ लाखांचा मुद्देमाल लांबविला

जळगाव -लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील सुनसगाव रस्त्यावरील जय हिंद फर्नीचर कंपनीत मध्यरात्री दोन कर्मचाऱ्यांना टॉवेलने बांधून दुकानातून बेडींग मशिन, लोखंडी प्लेटा, लोखंडी लादीसह आदी साहित्य असा एकुण ४ लाख ९५ हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शनिवारी २० जुलै रोजी मध्यरात्री १.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नशिराबाद ते सुनसगाव रस्त्यावर मनोज पंढरीनाथ पाटील वय ४५ रा मोहाडी रोड, जळगाव यांचे जय हिंद फर्निचर दुकान आहे. शनिवारी २० जुलै रोजी मध्यरात्री त्यांचे दुकानातील कर्मचारी जितेंद्र कुमार राम नरेश कुमार वय २८ आणि पिंटू कुमार शिवचंद्रराम वय २६ दोन्ही रा. उत्तरप्रदेश हे दोघेजण दुकानाच्या आत झोपलेले असतांना अज्ञात चार ते पाच जण घेवून दुकानात घुसून कर्मचाऱ्यांना टॉवलने बाधून दुकानातून बेडींग मशिन, लोखंडी प्लेटा, लोखंडी लादीसह ४ लाख ९५ हजारांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार समोर आल्यानंतर दुकान मालक मनोज पाटील यांनी नशिराबाद पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रात्री ८ वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सपोनि रामेश्वर मोताळे हे करीत आहे.

Protected Content