पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वेरुळी ता.पाचोरा येथील पाचोरा तालुक्याची संजीवनी असलेल्या बहूळा धरण हे परतीच्या पावसामुळे एकाच दिवसात शंभर टक्के भरले आहे. सलग तिसऱ्या वर्षी धरण हे शंभर टक्के भरले आहे.
दि. १९ रोजी दुपारी धरणातुन पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.बहूळा धरणात आतापर्यंत ३० टक्के जलसाठा होता. दोन दिवसांपासून झालेल्या पाऊसाने धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. उगमस्थानावर जोरदार पाऊस झाल्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरु आहे. प्रशासनाने रात्री पासून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सुचना देण्यात आलेल्या आहेत. वेरुळी खु” व वेरुळी बु” या गावांना जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे. लोकांनी सावधानी बाळगा. राहुल शेवाळे शाखा अभियंता बहूळा मध्यम प्रकल्प वेरुळी
उतावळी लाही पुर
बहुधा धरणाच्या खालच्या बाजूने येणारी उतावळी नदीचा उगम हा वाकडी कोकडी धरणाच्या वरती जंगलात आहे. धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हे धरण भरल्याने या उतावळी नदीला पूर आला आहे. लोहारा, सांगवी, साजगाव मार्गे ती नदीचे खेडगाव हुन बहुधा नदीतून गिरणा नदीला मिळते.