जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मिलिंद लोखंडे यांचे ज्येष्ठ चिरंजीव दिवंगत स्वप्नील यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त ग्रा.पं. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना लोखंडे परिवारातर्फे भोजन वाटप करण्यात आले.
मागील वर्षी अल्पशा आजाराने स्वप्नील चे दुःखद निधन झाले होते. या प्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या तसेच दिवंगत स्वप्नीलच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
स्वप्नील याच्या आई वडिलांनी व परिवारातील सदस्यांनी पुष्पहार अर्पण केले.
तसेच यावेळी नवोदय दिवंगत स्वप्नील याच्या आठवणींना उजाळा देत भारतीय बौध्द महासभेचे जळगाव जिल्हा संस्कार विभाग प्रमुख आयु.सुशीलकुमार हिवाळे, भा. बौ . महासभेचे जामनेर तालुका संस्कार सचिव आयु. माणीकराव लोखंडे, नगरसेवक महेंद्र बाविस्कर, तसेच ज्योत्स्ना विसपुते मॅडम या सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या दुःखद प्रसंगी लोखंडे परिवाराला अश्रू अनावर झाले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भारतीय बौद्ध महासभेचे जामनेर तालुका अध्यक्ष वसंतदादा लोखंडे यांनी केले.
कार्यक्रमा नंतर शाळेतील विद्यार्थ्यांना अन्नदान करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी जामनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन, नगरसेवक जितेंद्र पाटील, दीपक तायडे , नगरसेवक कैलास नरवाडे, आश्रमळा शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष गोविंदा गुंजाळ,शाळेचे मुख्याध्यापक खेमराज नाईक सर तसेच शाळेतील इतर शिक्षक व मित्र परिवार उपस्थित होते