जळगाव, प्रतिनिधी | आयनॉक्स मल्टीप्लेक्स विरोधात माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी तक्रार केली होती. यानुसार आज अन्न औषध प्रशासन विभागातर्फे कारवाई करण्यात आली असता. आयनॉक्स मल्टीप्लेक्सला क्लीन चीट मिळाली आहे.
आयनॉक्स मल्टिप्लेक्स सिनेमा हॉलमध्ये खाद्यपदार्थ तसेच पाणी सुद्धा सोबत घेऊन जाण्याची प्रेक्षकांना परवानगी नाही. सिनेमा हॉलमध्ये जे पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे ते त्यांच्या किंमतीच्या प्रमाणापेक्षा जास्त वाढून विक्री करण्यात येत आहे. या तक्रारीनुसार सहाय्यक नियंत्रक बांगर यांच्या पथक आयनॉक्स मल्टीप्लेक्स मध्ये तपासणी केली. या तपासणीत हेमंत काशिनाथ पाटील खाद्यपदार्थ विक्रीच्या दुकानात हजर होते. तेथील आवेष्टित खाद्यपदार्थची किंमतीची चौकशी केली. त्यावेळी अधिकत्तम विक्री किंमत बिलिंग मशीनवर दर्शविली जाणारी किंमत ही एकच असल्याचे दिसून आले. पथकाच्या तपासणीत दीपक कुमार गुप्ता यांनी केलेली तक्रार खोटी असल्याचे आढळून आले. तेथे आवेष्टित वस्तू छापील किमतीनुसार विक्री होत असल्याचे आढळून आले आहे.