यावल, प्रतिनिधी । येथील तालुका शिवसेनेच्यावतीने पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त आदिवासी गोरगरीब गरजू नागरीकांना अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. शिवसेना तालुका शाखेच्यावतीने मोठ्या उत्सहात वर्धापनदिन साजरा करण्यात आला.
शहरातील आदीवासी वस्ती म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या गोळीबार टेकडीवर वास्तव्यास राहणारे व मोलमजुरी करून आपली उपजिवीका भागवणाऱ्या गोरगरीब आदिवासी बांधवांच्या कुटुंबांना मिठाईसह भोजन शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व पक्षाचे तालुकाप्रमुख रवी सोनवणे, माजी तालुकाप्रमुख कडु पाटील, शिवसेना आदीवासी सेलचे तालुका प्रमुख हुसैन जहांगीर तडवी, यावल शहरप्रमुख जगदीश कवडीवाले, गोटु सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुनिल बारी, पप्पु जोशी, सागर देवांग, तालुका प्रसिद्धी प्रमुख संतोष वाघ, शरद कोळी, निलेश पाराशर, अजहर खाटीक, मोहसीन खान, संतोष बारी, राजु शेख, सुधाकर धनगर, विष्णु आवरे, सचिन कोळी, गजु भोसले, किरण बारी, सागर बोरसे, योगेश चौधरी, यशवंत चौधरी, गायनसिंग बारेला आदींच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/396144931841205