पुणे वृत्तसंस्था | दिवसेंदिवस वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांची संख्या आणि त्यातच ओमायक्रॉनचं वाढत जाणारं संकट यामुळे मुंबई पाठोपाठ पुण्यातील इयता पहिली ते नववी पर्यंतच्या शाळा दि.30 जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय पुणे प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
पुण्यात पहिली ते नववी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सुरूच राहणार आहे. ]
पुणे येथे झालेल्या ‘कोव्हिड १९’ संदर्भात आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून शहरी हद्दीतील शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अद्याप पिंपरी-चिंचवड आणि पुणे जिल्ह्यातील शाळांबाबत अद्याप निर्णय झाला नाही.