रावेर, प्रतिनिधी | रावेर शहरासह परीसरात सर्दी-पडशासोबत फ्ल्यू’ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांची गर्दी वाढली आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलाचा परिणाम नागरिकांवर स्पष्ट दिसून येत आहे.
शहरातील ग्रामीण रुग्णालयात दररोज हजारो रुग्ण तपासणीसाठी येत आहेत. त्यामुळे अनेकवेळा उपचारासाठी रांगा लावून तासंतास खोळंबावे लागत असल्याने रुग्णांमध्ये वादही होत आहेत. त्या करिता रुग्णालयात डॉक्टर व नर्स यांची संख्या वाढवण्याची गरज असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्हा आरोग्य अधिका-यांनी याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. अनेकांना डोके दुखणे, कंबर दुखणे, ताप येणे या सारखी लक्षणे जाणवत आहेत. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून पिण्याचे आवाहन डॉ.बी.बी. बारेला यांनी केले आहे.