फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या वर्षी प्रमाणे सोमवारी रात्री १२ वाजून ५ मिनीटांनी शहरातील छत्री चौकात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. तरी पक्षपात व राजकारण मनात न ठेवता तिरंग्या वर श्रध्दा ठेवून आणि फैजपुर कांग्रेस अधिवेशनाच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी सर्व लोकानी उपस्थित राहावे, असे आवाहन फैजपुर काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.
फैजपुर नगरीला स्वातंत्र्य आंदोलनाचा मोठा व दैदिप्यमान इतिहास आहे. सन् १९३६ मध्ये भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे पहिले ग्रामीण अधिवेशन येथे आयोजित करण्यात आले होते. त्याचे महत्त्व लक्षात घेऊन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव प्रसंगी १५ ऑगस्ट २०२२ रोजी फैजपुर येथे छत्री चौकात १९३६ च्या अधिवेशनाच्या संकल्प चित्राजवळ रात्री १२ वाजून ५ मिनीटांनी ध्वजारोहणाचा कार्यक्रम फैजपुर शहर कांग्रेस कमेटी तर्फे आयोजित करण्यात आला होते. ध्वजारोहणाचा मान या फैजपुर अधिवेशनाच्या परंपरेचे पाईक मानले जाणारे आ. शिरीष मधुकरराव चौधरी ह्याना देण्यात आला होता. ह्या वर्षी पुनः एकदा रात्री १२ वाजून ५ मिनीटांनी छत्री चौकात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तरी पक्षपात व राजकारण मनात न ठेवता तिरंग्या वर श्रध्दा ठेवून आणि फैजपुर कांग्रेस अधिवेशनाच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी सर्व लोकानी उपस्थित राहावे, असे आवाहन फैजपुर कांग्रेस कमेटी ने केले आहे.