काँग्रेस कमिटीतर्फे क्रांती दिनानिमित्त ध्वजारोहण

जळगाव प्रतिनिधी । शहरातील काँग्रेस भवनासमोर आज क्रांतीदिनानिमित्त जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शहरातील महापुरूषांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.

अधिक माहिती अशी की, आज ९ ऑगस्ट म्हणजे क्रांती दिन साजरा करण्यात येत आहे. शास्त्री टॉवर चौकातील काँग्रेस भवनासमोर आज ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष ॲड. संदीपभैय्या पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरूवातीला सेवादल कार्यकर्त्यांनी काँग्रेस भवनापासून टॉवर चौक, नेहरू चौक, बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून काँग्रेस भवनापर्यंत पर्यंत रॅली काढण्यात आली. याप्रसंगी कॉग्रेस सेवादलचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील, महिला अध्यक्ष सुलोचना वाघ, शाम तायडे, जमील शेख, विजय वाणी, शशिकांत तायडे, मुक्तदिर देशमुख, दिपक सोनवणे, मनोज सोनवणे, जाकीर बागवान, योगेश देशमुख, जगदीश गाढे, विष्णू घोडेस्वार, प्रदिप सोनवणे, पी.जी. पाटील, ज्ञानेश्वर कोळी, अजमल शहा, उद्धव वाणी, नितीन चौधरी, राजेंद्र श्रीनाथ, नदीम काझी, छाया कोरडे, अशपाक काझी, भगवान मेढे, महेंद्रसिंग पाटील, विजय पाटील, भरत कुवर, राहुल भालेराव, प्रमोद गुघे, गोकुळ चव्हाण यांच्यासह 

असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content