देवळीत माजी सैनिकांच्या हस्ते ध्वजारोहण

अमळनेर प्रतिनिधी । स्वातंत्र्य दिनानिमित्त अमळनेर तालुक्यातील देवळी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत माजी सैनिकांनी ध्वजारोहण केले.

शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा  भारती मनोज पाटील,मुख्याध्यापक टी. आर.रणदिवे,व शालेय समिती सदस्य यांनी  ध्वजारोहणाचा सन्मान सैनिकालाच देण्यात यावा असा निर्णय घेतला.  यावेळी  सरपंच सरलाबाई  पुंडलीक पाटील, उपसरपंच संदीप शिंदे  यांचीही प्रमुख उपस्थिती होती.  

याप्रसंगी येथील माजी सैनिक मुकेश नवल पाटील  यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्याचे ठरले. मुकेश पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेत ध्वजारोहण  केले. यावेळी सूत्रसंचालन राजेंद्र पाटील सर व आभार रमेश पाटील सर यांनी मानले.याप्रसंगी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. त्यानंतर शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. देवगाव-देवळी ता.अमळनेर गावात पहिल्यांदाच सेवानिवृत्त सैनिकाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले अश्या वयोवृद्ध लोकांच्या प्रतिक्रिया मिळाल्या.

 

Protected Content