उमरदा येथे कोरोना योद्धांच्या हस्ते ध्वजारोहण

चोपडा प्रतिनिधी । शिरपूर तालुक्यातील उमरदा येथील शासकीय माध्यामिक आश्रम शाळा येथे कोरोना योद्धाच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्याने कोरोना योद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहावयास मिळले.

ध्वजारोहणा सन्मान मुख्याध्यापकांनी धुळे नियोजन समितीचे अध्यक्ष जयवंत पाडवी यांना देण्यात आला होता. परंतु त्यांनीं सर्व गांवकरीच्या संमतीने सूचित केले की, माझ्या हस्ते ध्वजारोहण करण्यापेक्षा या वर्षभरात सर्वात अधिक मेहनत करून आपले सर्वाचे प्राण वाचविण्यात ज्या कोरोना योद्धाचा सिहांचा वाटा आहे. अश्या सर्व योद्धाच्या हस्ते सामूहिक ध्वजारोहण करण्यात यावे असे सुचविले.

उमरदा ता.शिरपूर येथील  शासकीय माध्यामिक आश्रम शाळा येथे देशाच्या ७२व्या प्रजासत्ताक दिन असल्याने आज सकाळी आश्रम शाळेत उमरदा येथिल कोरोना योद्धा आरोग्य सेवक किरण मुरलीधर लुले, आरोग्य सेविका विध्या निकुंभे,संगीता अहिरे तसेच अंगणवाडी सेविका गीता जगन शेवाळे,  अनिता गेन्द्रे,  मालुताई पाडवी, कल्पना वळवी यांच्या सामूहिक हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी कोरोना योद्धाच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले. यावेळी आरोग्य सेवक लूले म्हणाले की, संपूर्ण गावांचा तर आम्ही ऋणी राहूच परंतु आजचा बहुमान ज्यांच्या मुळे मिळाला ते म्हणजे शिरपूर साखर कारखानाचे संचालक जयवंत दादा पाडवी ,शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष शिवाजी मांजऱ्या वसावे व सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक. असा सन्मान संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याच कोरोना योद्धाला मिळाला नसेल तो आम्हाला उमरदा आश्रम शाळेत मिळाला ही आठवण आयुष्यभर आम्हा सर्वांना लक्षात राहील असे त्यांनी बोलताना सांगितले.

यावेळी गावाचे सरपंच जमुनाबाई शिवाजी वसावे, समाजकल्याण सभापती मोगराताई जयवंत पाडवी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शिवाजी मांजऱ्या वसावे,उपसरपंच शेकिलाल नारसिंग गुलवणे, पोलीस पाटील, ग्रामसेवक , गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक सुनील चौधरी, शाळेतील सर्व शिक्षक- शिक्षेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले सूत्र संचलन पवार सर व आभार मोरे सर यांनी मानले सदर आश्रम शाळेतील ध्वजारोहण कार्यक्रमांचे सर्वच स्थरावरून कौतुक होत आहे तसेच धुळे येथील प्रकल्प अधिकारी  राजाराम हाडपे साहेब यांनी देखील दूरध्वनीवरून मुख्याध्यापक व सर्व शिक्षकांचे कौतुक केले.

 

 

 

 

 

Protected Content