नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | वादाच्या भोवर्यात सापडलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात पीएफआय संस्थेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी लादली आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून पीएफआय संस्थेची ठिकठिकाणची कार्यालये आणि पदाधिकार्यांवर छापे मारण्यात आले असून यात अनेकांना अटक करण्यात आली आहे. ही संस्था देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. याचमुळे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे. केंद्र सरकारने याबाबतचा अध्यादेश जारी केला आहे.
दरम्यान केंद्र सरकारने पीएफआय सोबतच इतर संघटनांवरही बंदी घातली आहे. यामध्ये रिहॅब इंडिया फाउंडेशन कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया ऑल इंडिया इमाम कौन्सिल नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्यूमन राइट्स ऑर्गनायझेशन नॅशनल वुमन फ्रंट, ज्युनियर फ्रंट, एम्पॉवर इंडिया फाउंडेशन आणि रिहॅब फाउंडेशन, केरळ आदी संस्थांचा समावेश आहे.