जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या संगणकशास्त्र प्रशाळेत झालेल्या वक्तृत्व व पोस्टर्स स्पर्धेत आदित्य पाटील याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्राप्त केले.
वक्तृत्व स्पर्धेसाठी सोशल मिडीया एथीक्स हा विषय देण्यात आला होता तर पोस्टर सादरीकरणासाठी IT@2050 असा विषय होता. ८० विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. रुपये ३०७५/- असे प्रथम क्रमांकासाठी पारितोषिक ठेवण्यात आले होते. प्रशाळेच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचा व्दितीय वर्षाचा विद्यार्थी आदित्य पाटील याने वक्तृत्व आणि पोस्टर या दोन्ही स्पर्धात प्रथम क्रमांक प्राप्त केला. वक्तृत्व स्पर्धेत अश्विनी पाटील व्दितीय तर प्रतिक्षा पाटीलने तृतीय क्रमांक प्राप्त केला. पोस्टर मध्ये शेख झाकीर सामी समीर हा व्दितीय तर प्रियंका झांबरे तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा.अनिल डोंगरे यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. प्रशाळेचे संचालक प्रा.सतीश कोल्हे यावेळी उपस्थित होते.
स्पर्धा समन्वयक म्हणून डॉ. संदीप भामरे, डॉ.स्नेहलता शिरुडे यांनी काम पाहिले. प्रा. ए.एस.पाटील, प्रा. मनीष जोशी, प्रा.बी.व्ही.पवार, प्रा.आर.जे.रामटेके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. परीक्षक म्हणून डॉ.सोमनाथ वडनेरे, डॉ.नीता पाटील, डॉ.नवीन दंदी, डॉ.रमेश सरदार व डॉ.सुरेंद्र कापसे यांनी काम पाहिले.