Home राजकीय पहिल्या टप्प्यातील मतदानास प्रारंभ

पहिल्या टप्प्यातील मतदानास प्रारंभ

0
50


नवी दिल्ली वृत्तसंस्था । लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यास आज सकाळपासून प्रारंभ झाला असून यात विविध पक्षांच्या मातब्बर नेत्यांची प्रतिष्ठा पणास लागली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानास आज सकाळी सात वाजेपासून सुरूवात झाली आहे. यामध्ये १८ राज्ये आणि दोन केंद्रशासीत प्रदेशातील ९१ जागांचा समावेश आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, हंसराज अहिर यांच्यासह विविध राजकीय पक्षाच्या बर्‍याच मातब्बर नेत्यांची या पहिल्या टप्प्यात प्रतिष्ठा पणास लागली आहे. दरम्यान, निवडणुकीच्या दरम्यान कोणताही अनुचीत प्रकार होऊ नये म्हणून तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. ठिकठिकाणी मतदारांनी मताचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्याचे चित्र दिसून आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound