फुले दाम्पत्याचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी- महाजन

70803569 8f43 4d84 b5f8 dd8fb3220241

अमळनेर (प्रतिनिधी) महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे कार्य देशाला दिशा देणारे असून पहिली शाळा फुले दाम्पत्यांनी १८४८ मध्ये पुणे येथे सुरू करून बहुजन समाजाला शिक्षणाची द्वारे खुली करून दिली होती. हंटर कमीशन समोर फुलेंनी सर्वाना शिक्षण सक्तीने मिळाले पाहिजे, ही मागणी करणारे फुले दाम्पत्यच खरे भारतरत्न आहेत. भारतरत्नापेक्षा फुले दाम्पत्यांचे कार्य मोठे आहे, असे प्रतिपादन तालुक्यातील देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक अनिल महाजन यांनी आज केले.

 

आज महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त शाळेत आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमांची सुरवात महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शाळेचे शिक्षक आय.आर.महाजन यांनी केले. तर आभार प्रदर्शन एस.के. महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे स्काऊट शिक्षक एच.ओ.माळी व शिक्षकेतर कर्मचारी गुरूदास पाटील यांनी प्रयत्न केले.

Add Comment

Protected Content