मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | संसर्ग काळात सर्वसामान्यांना मी जबाबदार असे प्रत्येक नागरिकास वाटावे, असे म्हणत धूर्तपणे जबाबदारी झटणाऱ्या आणि काश्मिरी पंडितांच्या कळवळ्याचे राजकारण करणाऱ्या ठाकरे सरकारने राष्ट्रीय प्रश्नावर बोलण्याअगोदर आपल्या अंगणात काय जळतेय ते पहा, अशी टीका भाजपचे केशव उपाध्ये यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली आहे.
दोन दिवसापूर्वीच काश्मिरी पंडितांसाठी महाराष्ट्र ठामपणे उभा असून त्यांच्यासाठी जे शक्य आहे ते सहाय्य करीत महाराष्ट्र आपले कर्तव्य बजावणार अशी भूमिका काश्मिरी पंडितांच्या हत्येच्या घटनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी चिंता व्यक्त केली होती.
यावर, केंद्र सरकारच्या द्वेषाची कावीळ झालेल्या ठाकरे सरकारने काश्मिरी पंडितांच्या कळवळ्याचे राजकारण करीत महाराष्ट्रातील समस्यांवरील सर्वसाधारण जनतेचे लक्ष भरकटविण्याचा प्रयत्न करीत आहे. गेल्या अडीच वर्षांत संसर्ग काळात हजारो कुटुंबे उघड्यावर आलीत, राज्यातील शेतकरी आत्महत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना, सर्वसामान्यांना या परिस्थितीला मी जबाबदार असे घोषवाक्य करीत मुख्यमंत्री मात्र जनतेची जबाबदारी झटकत होते. पण सत्ताधारी शिवसेनेतील अनेकजण मातोश्रीवर कोटी रुपयांची खैरात, मोक्याच्या जागांच्या मालमत्ता हडपण्याची कारस्थाने तर काही मंत्री पोलिसांना हाताशी धरून खंडणी वसुली करत होते. आणि आता काश्मीरसारखा राष्ट्रीयदृष्ट्या संवेदनशील प्रश्नावर नाक खुपसून सर्वसामन्यांचे लक्ष भरकटविण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
वृद्ध शिवसैनिक महिलेला घर देऊ शकत नाही, तिच्या कुटुंबातील तरुणाला नोकरी देऊ शकत नाही तसेच राज्यातील बेरोजगारी, जनतेच्या समस्या न सोडविता भ्रष्टाचार आणि दहशतवादाची पाठराखण करणारे मुख्यमंत्री केवळ केंद्राकडे बोट दाखवण्याचे राजकारण करतात त्यांनी अगोदर राष्ट्रीय प्रश्नावर बोलण्याऐवजी आपल्या अंगणात काय जळते ते अगोदर पहा असेही उपाध्ये यांनी म्हटले आहे.