जळगाव (प्रतिनिधी) पहिल्या आशियाई चित्रपट महोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून, येत्या १ ते ४ मार्च दरम्यान माया देवी नगर येथील रोटरी हॉल येथे हा महोत्सव संपन्न होत आहे. महोत्सवाचे उद्घाटन १ मार्च रोजी सकाळी १० वाजता आ. स्मिता ताई वाघ आणि ‘श्वास’ चे दिग्दर्शक संदीप सावंत यांचे हस्ते योजण्यात आले असून, समारोप ४ मार्च रोजी सायंकाळी ७:३० वाजता जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांचे हस्ते संपन्न होणार आहे. या प्रसंगी फर्जंद चित्रपटाचे चे दिग्दर्शक दीपक लांजेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
पर्यटन वा सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या सहयोगाने अजिंठा फिल्म सोसायटी यांच्या सहकार्याने समर्पण संस्थेच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाची सुरवात राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक, व पटकथा लेखक संदीप सावंत यांनी दिग्दर्शित केलेल्या नदी वाहते या चित्रपटाने होणार आहे. या महोत्सवात लीफ ऑफ लाइफ (इराण), लेडी ऑफ द लेक (मणिपूर), तासफिया (ताजिकिस्तान), लीना (अफगाणिस्तान), सिन्सियरली युवर्स (ढाका), ख्यानिका – द लॉस्ट आयडिया (ओडिया), टाईड हॅन्ड्स् (इस्त्रायल), गेईओनी – व्हॅली ऑफ स्ट्रेन्थ (इस्त्रायल), तीन मुहूर्त (हिंदी), रानाज् सायलेन्स् (इराण), आक्रीत (मराठी), जोहार मायबाप जोहार (मराठी), मदरिंग (इराण), बेन्स बायोग्राफी (इस्त्रायल), रजनीगंधा (हिंदी), पुष्पक विमान (मराठी), भोर (हिंदी), अंडरपॅन्ट थिफ (श्रीलंका), बंदिशाला (मराठी), तालन (काझीकीस्तान), भयकंम (मल्याळम), द बॅड पोइट्री (जपान), अॅन्ड वन्स अगेन (इंग्रजी), हान्दुक द हिडन कॉर्नर (असमिया), मरमेड (इराण) आणि आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त चित्रपटांचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
मोफत प्रवेशिका खालील ठिकाणी मिळतील
शारदाश्रम विद्यालय, ७९ / १ व २ कोल्हे नगर (प.) जळगाव, पर्यावरण शाळा ३९, शाहू कॉम्प्लेक्स्, जोशी बंधू जेम्स अॅन्ड ज्वेलर्स, नवीपेठ आणि फोटो फाईन (महाबळ) येथे उपलब्ध आहेत. अधिक माहिती साठी राहुल सोळुंके (९८५०९३११६५), संदीप झोपे (९४०४०४७०३४) यांचेशी संपर्क साधावा.