वॉशिंग्टन वृत्तसंस्था । अमेरिकेतील न्यू जर्सी शहरामध्ये गोळीबारा झाल्याची घटना घडली आहे. या गोळीबारामध्ये एका पोलिस अधिकाऱ्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर एका नागरिकासह दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना शहराच्या बेव्यू परिसरात असलेल्या एका दुकानाबाहेर घडली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, बेव्यू आणि मार्टिन ल्यूथर किंग मार्गावर स्थानिक वेळेनुसार दुपारी झालेल्या चकमकीत एका पोलीस अधिकाऱ्यासह तीन नागरिक आणि दोन हल्लेखोर ठार झाले आहेत. हल्लेखोर मोठा हल्ला करणार होते, अशी माहिती असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती महापौरांनी दिली आहे. हल्लेखोरांनी दोन ठिकाणी हल्ला केला असल्याचे समजते. एका स्मशानभूमीजवळ पोलिसांसोबत चकमक झाली. या ठिकाणी पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर हल्लेखोरांनी कोशेर सुपरमार्केटमध्ये गोळीबार सुरू केला. या ठिकाणी पोलीस आणि स्वाट पथक दाखल झाले. या चकमकीत हल्लेखोरही ठार झाले असल्याची माहिती स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिली आहे.