नवी दिल्ली वृत्तसंस्था । राजधानी दिल्लीच्या किराडी भागातल्या कापड दुकानासन मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत नऊ जण ठार झाले असून ती जखमी झाले आहेत. यात वित्तहानीदेखील मोठ्या प्रमाणात झालेली आहे.
याबाबत वृत्त असे की, दिल्लीच्या किराडी भागातील कापड गोदामाला सोमवारी मध्यरात्री १२.३० वाजता आग लागली. संपूर्ण गोदाम कपड्यांनी भरलेले असल्याने काही क्षणातच आग पसरली. दरम्यान, यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला. तर तिघांवर अद्याप उपचार सुरु आहेत. या भीषण आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर जीवितहानीबरोबरच आर्थिक नुकसानही झाल्याचे दिसून येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर अग्नीशामन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.