झारखंडमध्ये मतमोजणीस प्रारंभ

EVM.jpg.15186720b5e46b3d2f0f9be1c31ee467

रांची वृत्तसंस्था । झारखंडमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजेपासून सुरू झाली असून यात भाजप आणि विरोधकांमध्ये चुरस पहायला मिळण्याची शक्यता आहे.

झारखंडमधील ८१ जागांसाठी नुकतेच चार टप्प्यांमध्ये मतदान झाले होते. यात भारतीय जनता पक्षाने स्वबळावर निवडणूक लढविली असून एनडीएचा घटकपक्ष असणारे जेडीयू आणि एलजेपीने स्वतंत्र निवडणूक लढविली आहे. तर झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस व राष्ट्रीय जनता दलदेखील रिंगणात आहेत. या अनुषंगाने आज सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू झाली असून यात नेमकी कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content