एमआयडीसीतील मोरया ग्लोबल केमीकल कंपनीला आग; किरकोळ नुकसान

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी परिसरात डब्लू सेक्टमध्ये असलेल्या मोरया ग्लोबल या केमिकल बनविणार्‍या कंपनीत आज सकाळी अचानकपणे केमिकलला आग लागली. मात्र अग्निशमन विभागाच्या कंपनीच्या कर्मचार्‍यांनी वेळीच पोहचून केमिकल फोमचा मारा करुन आग आटोक्यात आणली. त्यामुळे दुर्घटना टळली. या आगीत किरकोळ नुकसान झाले आहे.

सविस्तर असे की, एमआयडीसी डब्यू सेक्टरमध्ये प्लॉट नं २४ व २५ येथे मोरया ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड नावाची केमिकल बनविणारी कंपनी आहे. या कंपनीत आज रविवार २५ एप्रिल रोजी काम सुरु असतांना सकाळी ९ वाजून ५५ मिनिटांनी मशीनमध्ये असलेल्या केमिकलला अचानकपणे आग लागली. याबाबत कंपनीचे मालक अरुण निंबाळकर यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळ गाठले. अग्निशमन विभागाचे शशिकांत बारी, सहाय्यक अग्निशमन  अधिकारी सुनील मोरे यांच्या मार्गदर्शनात खाली अग्निशमन दल वाहन चालक देविदास सुरवाडे, हेड फायरमन रोहिदास चौधरी, सहाय्यक फायरमन भगवान पाटील, हिरामण बावस्कर, वाहन चालक संजय भोईटे, सरदार पाटील, जगदीश साळुंखे या कर्मचार्‍यांनी केमिकल फोमचा मारा करुन आग आटोक्यात आणली. त्यामुळे अनर्थ टळला. एमआयडीसी पोलिसांनीही घटनास्थळी जावून माहिती घेतली. मात्र कंपनीचे मालक अरुण निंबाळकर यांनी किरकोळ नुकसान झाले असून कुठलीही तक्रार नसल्याचे पोलिसांना सांगितले.

आम्हाला फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.